Headlines

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त




कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील वादळग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. वादळाचा सर्वाधिक फटका फळबागा, नर्सरी आणि पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. आमदार काळे यांनी बाधित नागरिकांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. या कठीण प्रसंगी शासन आणि प्रशासन संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभे आहे. कोणीही चिंता करू नये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युद्धपातळीवर पंचनाम्यांचे आदेश नुकसानग्रस्त भागातूनच नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तालुक्यात एकाही नुकसानग्रस्त नागरिक किंवा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने पारदर्शक आणि गतीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच हा अहवाल त्वरित शासनाकडे सादर करण्याची सूचना केली. महायुती सरकारकडून जास्तीत जास्त मदतीसाठी पाठपुरावा यापूर्वीही तालुक्यावर आलेल्या नैसर्गिक संकटांच्या वेळी महायुती सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करून आपण बाधित शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून दिली आहे. त्याच धर्तीवर, याही वेळी झालेल्या अतोनात नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार काळे यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी होते. तत्काळ भरपाई मिळावी ^ आ. काळे यांनी नुकसानीची पाहणी केली असली तरी देखील तत्काळ संपूर्ण पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विमा प्रतिनिधींना देखील तत्काळ मदत देण्याचे निर्देश द्यावे. फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांना मदत मिळावी हिच अपेक्षा. – विजय जाधव शेतकरी, किसान काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *