Headlines

पगार थकला, अधिकाऱ्याच्या टेबलवरच गळफासचा प्रयत्न:सहकारी संस्था साखर कार्यालयातील प्रकार‎




शहरातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या “सहकारी संस्था (साखर)’ कार्यालयात मंगळवारी (२६ मे) एका कर्मचाऱ्याने थकीत पगारासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. हक्काच्या पैशांसाठी अनेक वर्षे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने, संतप्त कर्मचाऱ्याने थेट विशेष लेखापरीक्षकांच्या कार्यालयात टेबलवर उभे राहून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. नगर तालुका सहकारी साखर कारखाना २०१२-१३ पासून बंद असून सध्या त्यावर अवसायक म्हणून विशेष लेखापरीक्षक सतीश पोकळे काम पाहत आहेत. याच कारखान्यातील कर्मचारी अखील शेख यांचा ३३ महिन्यांचा ३ लाख ८० हजार रुपयांचा पगार २०१३ पासून थकीत आहे. दरम्यान, न्यायालयाचे व्याजासह पैसे देण्याचे आदेश असतानाही पैसे मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे अखील शेख म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *