![]()
पाथर्डी भारतात गाय ही केवळ एक प्राणी नसून ती श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ (राष्ट्रीय पशू) म्हणून घोषित करावे. तसेच गोवंश हत्या, विक्री, खरेदी आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी समस्त पाथर्डी तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रसाद मते यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्व धर्मीय नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा, बंधुता आणि परस्पर आदर टिकून राहण्यासाठी शासनाने गोवंश रक्षणाबाबत योग्य व कडक पावले उचलणे गरजेचे आहे. गोहत्येमध्ये थेट सहभागी असणारे विक्रेते, खरेदीदार आणि वाहतूकदार यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे; मात्र ही कारवाई करताना कोणत्याही निष्पाप नागरिकाला विनाकारण त्रास न देता केवळ प्रत्यक्ष दोषींवरच कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही मागणी याद्वारे करण्यात आली. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, शहराध्यक्ष जुनेद पठाण, सामाजिक कार्यकर्ते शन्नो पठाण, मुन्ना खलिफा, एजाज शेख, आरिफ कुरेशी, समीर शेख, आसिफ शेख, ईश्तियाक चौधरी, उस्मान बादशाह शेख, जानमोहम्मद पटेल, अजीज शेख, सुनील दौंड, सरफराज चौधरी, आनंद सानप, जावेद पिंजारी आदी उपस्थित होते.
Source link
गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी:पाथर्डीत मुस्लिम समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन