Headlines

बंजारा टायगर संघटनेचे आंदोलन मागे:मंत्री जयकुमार गोरेंच्या आश्वासनानंतर पेच सुटला, तांडा समृद्धी योजनेतील निधीवाढीवर सकारात्मक चर्चा




बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत जयकुमार गोरेंनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले. जयकुमार गोरे यांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी जयकुमार गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे ही वाचा… सातारा झेडपी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार:प्रश्नचिन्हाचे कारण नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवावी – आमदार महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *