![]()
परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उषा कडू ठोंबरे यांच्या शेतातील सोलार पॅनल वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी वाऱ्याचा वेग इतका होता की अनेक शेतांमधील पत्रे उडाले. झाडांच्या फांद्या तुटल्या. विजेच्या तारा व खांबांनाही वादळाचा फटका बसला आहे. गट क्रमांक ४७ मधील उषा कडू ठोंबरे यांच्या शेतात बसवण्यात आलेले सोलार पॅनलचे स्ट्रक्चर उखडले. पॅनल हवेत उडून दूरवर फेकले गेले. सध्या सोलार पंप व सोलार पॅनल ही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांमधून कर्ज काढून किंवा स्वतःची आर्थिक जुळवाजुळव करून सोलार यंत्रणा बसवलेली असते. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अशा नुकसानीसाठी तातडीची मदत मिळाली नाही तर शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येईल.
Source link
दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी