![]()
मोहोळ तालुक्यातील नरखेड भागातून वाहणाऱ्या डिकसळ येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरील संरक्षक कठडे व पाईप मोडून नदीपात्रात फेकून दिले गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून भोगावती नदी वाहत आहे. या नदीवर देगाव, डिकसळ, भोयरे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यावरून वडाळा, सोलापूरला मोठ्या प्रमाणात लहान-मोठी वाहतूक होत आहे. मागील वर्षी पावसाळ्याच्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोगावती नदीला दोन ते तीन वेळा महापूर आला होता. या महापुरामुळे डिकसळ येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे व पाईप पाण्याच्या प्रवाहामुळे असक्षम अवस्थेमध्ये बंधाऱ्यामध्ये पडले होते. महापूर येऊन अनेक महिने झाले तरीदेखील याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सदर ठिकाणावरून कॉलेज, स्कूल, शासकीय कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी वर्दळ आहे. सदर ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांना येत आहे. संबंधित विभागाने वाहनधारक व नागरिकांच्या जीवाचा विचार न करता कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नव्हती. संरक्षण कठडे व पाईप आहे या मोडकळीस ^विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेल्या बंधाऱ्यावरील संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठडे बसवावेत. डिकसळ येथील भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरील एका बाजूचे संरक्षक कठडे व पाईप काढून नदीपात्रात टाकून दिल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने अपघात होण्यापूर्वी संरक्षक कठडे व पाईप बसवावेत. अन्यथा होणाऱ्या घटनेस अधिकाऱ्यास जबाबदार धरावे. — गोविंद पाटील ( नागरिक , डिकसळ) मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये उभे होते. मागील आठवड्यात डिकसळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी संरक्षक पाईप व सिमेंटचे कठडे मोडून खाली नदीपात्रात ढकलून दिले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे व पाईप नसल्याने, तसेच त्यातच बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू मोठ्या प्रमाणावर सांडलेली असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरून बंधाऱ्यावरून थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यापूर्वी उपाययोजना आवश्यक भोगावती नदीला आलेल्या महापुरानंतर डिकसळ येथील बंधाऱ्याची झालेली दुरवस्था वेळीच दुरुस्त करणे पाटबंधारे विभागाचे कर्तव्य होते. मात्र, अनेक महिने हे संरक्षण कठडे मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभे राहिले आणि आता ते थेट नदीपात्रात पाडून देण्यात आले आहेत. रस्त्यावरील सांडलेली वाळू आणि कठड्यांचा अभाव यामुळे हा बंधारा आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मोठा अपघात घडून जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने येथे तातडीने काम करणे गरजेचे आहे.
अपघात होण्यापूर्वी तातडीने कठडे बसवावेत