![]()
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच हे सरकार आले आहे. ढच्या महिनाभरात टप्पाटप्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंधंन तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे. पण अनेक ठिकाणी विमानाचे उड्डान रद्द करण्यात आले आहे. इंधंनाचा तुटवडा आहे हे मान्यच केले पाहिजे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे दिवस येणार आहे. जनतेने सरकारच्या विश्वासावर कुठेही पैसे गुंतवू नये. कारण तो वापस येणार नाही. सरकारने बँकासुद्धा रिकाम्या केल्या आहेत.जनतेने पैसे सुरक्षित ठेवले पाहिजे. रिझर्व बँकेतील पैसे सरकारने काढून घेतले आहे. देश सर्वच बाजूनं संकटात आहे. SIR च्या नावाने मतदारांची नावे कमी करतायत विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांचा जीव जातोय याकडे सरकारचे लक्ष नाही ते पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करतील आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पडदा टाकण्याचे काम करतील. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर आम्ही काही बोलणार नाही. पण निवडणूक आयोग हे भाजपचे दलाल म्हणून काम करत आहे. त्यांनी आमच्यावर हवी ती कारवाई करावी. एसआयआरच्या नावाने ज्या राज्यात सरकार येणार नाही त्या राज्यातील मतदारांची नावे कमी केली जात आहेत, असया आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकार भावना भडकवतंय विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे आणि सरकार तणाव निर्माण करत आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जावू नये यासाठी हे सर्व काही सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवत लोकांना मारायचे त्यांचे राजकारण करायचे काम सरकारकडून सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे सत्ताधाऱ्यांचा धंदा विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करणे हा सत्ताधाऱ्यांचा धंदाच झाला आहे. सरकारने जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला पाहिजे. यांनी संविधानाची भाषा करूच नाही. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सरकारमधील मंत्रीहे असंवेदनशील आहेत. ते मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहे, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
Source link
गरीब- मध्यमवर्गीयांना मारण्यासाठीच हे सरकार:डिझेल 150, पेट्रोल 170 रुपये होणार, निवडणूक आयोग भाजपचा दलाल- विजय वडेट्टीवार