आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जा
.
पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
५,५०० गाड्या, ११ हजार चालक-वाहक
वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भाविकांची गर्दी विभागण्यासाठी चार तात्पुरती बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यभरातून वारकऱ्यांना आणण्यासाठी आणि सुखरूप सोडण्यासाठी ५ हजार ५०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक अहोरात्र कार्यरत असणार आहेत. यंदाच्या वारीमध्ये प्रथमच एक नवा प्रयोग केला जात आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार आहे.
विनायक राऊतांवर बोलणे टाळले, संजय राऊतांना टोला
याच दौऱ्यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरगुती वादावर आणि त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्षेपांवर आपली प्रतिक्रिया दिली. विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, त्यावर प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. “खासदार संजय राऊत सकाळी उठल्यापासूनच प्रत्येक गोष्टीवर संशय व्यक्त करायला सुरुवात करतात. विनायक राऊत हे त्यांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात विनाकारण संशय व्यक्त करू नये. हा राजकारणाचा भाग असला, तरीही एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत वैयक्तिक आणि कौटुंबिक विषयावर जाहीरपणे बोलणे योग्य नाही,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
हे ही वाचा…
वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका

पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…