![]()
विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांनी नुकतेच पुण्यात ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले की, सीतेशिवाय रामराज्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. एमआयटी डब्ल्यूपीयू येथे हा कार्यक्रम पार पडला. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतरित ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या शीर्षकाने प्रकाशन करण्यात आले. यावेळी भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशनचे कार्यवाह काशीनाथ देवधर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आणि गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते. भैय्याजी जोशी यांनी सीतेच्या जन्माचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीता ही भूमिपुत्र असून तिचा जन्म शरीर रचनेच्या पलीकडचा आहे. राम आणि सीतेकडे दैवी आत्मा म्हणून पाहिले पाहिजे. या दोघांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेले कार्य हे धर्मकार्य आहे. शस्त्र कधीच शांती निर्माण करू शकत नाही, त्यातून विनाशच होतो. शांतीसाठी शस्त्र नष्ट करावे लागेल. रामायणातील आदर्श लक्ष्मण रेषेचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे, कारण मर्यादा नसल्यास विनाश अटळ आहे. राजा हा राज्याचा स्वामी नसून दायित्व घेऊन निघालेला असतो, असेही त्यांनी नमूद केले. सीतेने सांगितले की, व्यक्ती सुखी असावी पण सुखासीन नसावी. प्रजेच्या रक्षणासाठी राजाने विचारपूर्वक कार्य करावे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक प्रजेला समजायला हवा. गुरुकुल हे विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणारे आहेत. आकलन करून विचारांच्या आधारेच हा देश पुढे नेता येईल, असेही भैय्याजी जोशी यांनी सांगितले. काशीनाथ देवधर यांनी सांगितले की, या पुस्तकात हिंदुत्वाविषयी पसरलेल्या गैरसमजांबद्दल नोंद आहे. साध्वी डेना मरियम यांनी लिहिलेल्या या पुस्तकात सहनियोजनाचे कार्य सोपविण्यात आले आहे. डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रभू रामांचे आदर्श आजही सुसंगत असून समाजाला योग्य दिशा दाखवतात असे मत व्यक्त केले. सत्य, नीतिमत्ता आणि सन्मानाच्या मार्गाचे अनुसरण करून एक आदर्श समाज घडवता येतो. भारतीय स्त्रीच्या मनात स्त्रीचे धैर्य, सामर्थ्य आणि तिच्या व्यक्त व अव्यक्त जगावरील प्रेमाची तसेच सर्वांच्या कल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ त्यागाची कथा या पुस्तकात आहे, असेही त्यांनी सांगितले.
Source link
सीतेशिवाय रामराज्याची कल्पना अपूर्ण: भैय्याजी जोशी:एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन