Headlines

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली:संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; ऑपरेशन टायगरवर पलटवार




राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राऊतांनी सूचक शब्दांत सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आठ खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात झालेल्या एका कथित गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. शिवसेनेचे नऊ खासदार एकजुटीने एकत्र आहेत, त्यांच्यात कोणतीही फूट पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. ठाकरे गटातील एकाही खासदाराला फोडणे शक्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान दिले. त्यामुळे ऑपरेशन टायगर, खरेच यशस्वी होणार की फक्त राजकीय हवा आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *