![]()
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक
.
क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.बारस्कर यांनी सावरकरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, सावरकरांच्या मनात बालपणापासूनच प्रखर राष्ट्रभक्तीची भावना होती. इंग्रज हुकूमशाहीविरुद्ध लढा उभारण्यासाठी त्यांनी शेकडो युवकांना एकत्र केले आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी आणि आक्रमक दिशा दिली. आजच्या नव्या पिढीने सावरकरांचे हे विचार, त्यांचा त्याग आणि राष्ट्रसेवेची भावना स्वतःमध्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमादरम्यान नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनप्रवासाला आणि आंदोलनाला उजाळा दिला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या सावरकरांच्या जयघोषाने संपूर्ण चौपाटी कारंजा परिसर भक्तीमय आणि देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. या अभिवादन सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, कार्याध्यक्ष ऋषिकेश रासकर, रवी दंडी, आदिनाथ येडे, आनंद राठोड, मयूर जोशी, बाबू बारस्कर, संदीप गोसावी, अजिंक्य गुरव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.