Headlines

ज्येष्ठ नागरिकाची 4.98 लाखांची फसवणूक:मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक




मतदार नोंदणी यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची 4 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहतात. त्यांच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला निवडणूक आयोगाचे कर्मचारी भासवून, मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (SIR फॉर्म) त्रुटी असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक एपीके (APK) फाइल पाठवली. ही एपीके फाइल उघडताच चोरट्यांनी मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतला. हा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असल्याने, चोरट्यांनी त्या खात्यातून 4 लाख 98 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. फेरीवाल्याकडे हफ्ते मागून जीवे मारण्याची धमकी दरम्यान, एका फेरीवाल्याकडे दरमहा हप्ता मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शैलेश साहेबराव शिरसाट (वय 36, रा. झंकार सोसायटी, रामवाडी, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील रामवाडी परिसरात तक्रारदार तरुणाने आपली गाडी लावली होती. आरोपी शैलेश शिरसाट याने तरुणाला धमकावले की, या भागात व्यवसाय करायचा असेल तर 30 हजार रुपये अनामत रक्कम आणि दरमहा 15 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. आरोपीने तरुणाला धमकावून त्याच्याकडून 5 हजार रुपये घेतले. आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *