Headlines

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट', 2024 च्या निवडणुकीत 20,625 मतांनी खान पराभूत!




निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची 16 आणि 17 एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणी
सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024 मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार 2024 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दिव्य मराठी नॉलेज काय आहे ‘डायग्नोस्टिक टेस्ट’? हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. 16 आणि 17 एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल.— नसीम खान, याचिकाकर्ते 20,625 मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 409 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी 2024 मध्ये मात्र ही आघाडी तब्बल 20,625 मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण 53% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी 1,24,641 मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना 1,04,016 मतांवर समाधान मानावे लागले. 2019 च्या ‘काट्याच्या’ लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ची चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *