Headlines

रामदास आठवलेंनी काढला मनोज जरांगेंचा चिमटा:म्हणाले – जरांगे माझे चांगले मित्र, ते पण कलाकार, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न!




मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत. ते सुद्धा एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण आपल्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. मला रखरखत्या उन्हात बसण्याची हौस नाही. पण सत्तेत बसलेले लोक मराठा समाजाची क्रूर अग्निपरीक्षा घेत आहेत. आंदोलन मोडीत काढण्याची भाषा व दादागिरी बंद करा. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी केवळ 2 दिवस माझ्यासारखे मे महिन्यातील कडक उन्हात बसून दाखवावे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. फडणवीसांनी नेहमीच मराठा समाजाची बाजू घेतली रामदास आठवले यांनी आज मिठी नदीच्या साफसफाईची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे पाटील एक चांगले कलाकार असल्याचा त्यांचा चिमटा काढला. आठवले म्हणाले, मनोज जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत. ते पण कलाकारच आहेत. त्यांनी काय करावे याविषयी मी काही बोलणार नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मराठा समाजाची बाजू घेतली आहे. त्यांनी नेहमीच मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. केंद्र व राज्य सरारने मराठा समाजाला 10 टक्के ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिले आहे. त्याचा फायदा मराठा समाजाला फारसा होत नाही. तो त्यांना मिळावा असी आमची सरकारकडे मागणी आहे. रामदास आठवले यांनी यावेळी सरकारकडून लवकरच करण्यात येणाऱ्या महामंडळांच्या नियुक्त्यांवरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी रिपाइं (आ.) ला किमान 2-3 महामंडळांचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली. आम्हाला एमएलसी मिळणार होती. पण ती मिळाली नाही. विधानपरिषदेत उमेदवारीही मिळण्याची चिन्हे नाहीत. आमच्यावरील अन्याय दूर व्हावा अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी 2-3 महामंडळांचे अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावे. आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे, असे ते म्हणाले. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्ला मनोज जरांगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप व मित्रपक्षांतील अनेकांचा राजकीय गेम करून त्यांना संपवले. चंद्रकांत दादा, गिरीश महाजन, बच्चू कडू, महादेव जानकर, किरीट सोमय्या आणि आत्ता महायुतीची वकिली करणारे सदाभाऊ खोत यांच्याविषयी काय झाले हे सर्वश्रूत आहे. आता या यादीत राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांचा नंबर आहे. या सरकारने लाखो मराठ्यांच्या कुमबी नोंदी सापडल्याचा गाजावाजा केला. पण प्रत्यक्षात मराठा मुलांना ना प्रमाणपत्रे मिळाली, ना व्हॅलिडिटी मिळाली. सरकारच्या या भूमिकेमुळे लाखो मराठा मुलांचे शैक्षणिक आयुष्य व करिअर उद्ध्वस्त होत आहे. यापूर्वी 1500 ते 800 गुन्हे मागे घेण्याचा विषय आधी ठरला होता. आता सरकार फक्त 64 गुन्हे बाकी असल्याचे म्हणत असेल, तर आमची त्यावर त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याची तयारी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *