Headlines

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎




मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील दिगंबर विलास लाळे यांची पावणे पाच एकर आंब्याची बाग आहे. सात वर्षांपूर्वी या आंब्याच्या बागेची लागण केली होती. यंदा बागेतून २५ ते ३० टन माल निघणे अपेक्षित होते, तर उत्पादन २५ ते ३० लाख रुपये होणे अपेक्षित होते. मात्र मागणी नसल्यामुळे बागेत माल झाडालाच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल की नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे अपेक्षेपेक्षा माल मोठ्या प्रमाणात आला आहे. परंतु मार्केट दर कोसळल्यामुळे जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी फळ कमी असताना उत्पन्न जास्त झाले होते. यंदाच्या वर्षी फळ जादा आहे, परंतु मार्केट मधील दर अचानक कोसळल्याने हाती काही लागेल की नाही अशी शंका व्यक्त होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आंबा सडून जात आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच चिंतेत पडला आहे. कांद्याप्रमाणेच यंदाच्या वर्षीच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अनुदान द्यावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. केशर दर – ५० ते १०० रुपये हापूस – ५० ते १५० रुपये दशेरी – ५० ते २०० रुपये मल्लिका – ५० ते १०० रुपये लंगडा – ५० ते १०० रुपये लालबाग – ८० ते १०० रुपये ^मुलाने सात एकर आंब्याची बाग लावली आहे. सदर बागेकडे जाण्यासाठी शेजारील शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे. त्यामुळे मजबूत रस्ता देखील नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंबा बागेला भरपूर माल लागला आहे. आंबा जनावरांना घालायची वेळ आली आहे. मात्र दर कोसळल्यामुळे मेहनतीचा खर्च देखील निघणार नाही अशी अवस्था झाली आहे. सिंधू लाळे, शेतकरी यंदाच्या वर्षीचे दर मेहनत अन् खर्चाचा पैसेही निघणार नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *