![]()
हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी ता ३१ भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. हिंगोली तालुक्यातील माळधामणी शिवार भूकंपाचे केंद्रबिंदू असून भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. यामुळे कुठेही जीवित वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे तसेच भूकंप जाणवण्याच्या घटना वाढत आहेत. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. पांगरा शिंदे, सुकळी, वापटी, कुपटी, राजदरी, सोनवाडी, पिंपळदरी, जलालदाभा, पोतरा, सिंदगी, नांदापूर, बोल्डा, सिरली याभागात भूकंपाची तिव्रता अधिक जाणवत आहे. त्यातच भूगर्भातून आवाज येण्याचे प्रकार या भागातील गावकऱ्यांच्या अंगवळणी पडले आले. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचे केंद्र बिंदू हिंगोली तालुक्यातील माळधामणी शिवार आहे. या भूकंपाची 3.5 रिस्टर्स स्केल नोंद झाली आहे. यामुळे कुठेही जीवित वित्तहानी झाली नाही मात्र नागरिकांमधून भीतीचे वातावरण कायम आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन “हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, या घटनेची नोंद भूकंप मापन केंद्रामध्ये 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेची झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे”, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी म्हटले आहे. “प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. तसेच कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा”, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांमधून भूकंप बाबतची धास्ती कायम दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्याची प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंप शास्त्र विभागाने चालवले आहेत. त्यासाठी ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले असून त्यावरील नोंदीची तपासणी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्यापही याबाबतची ठोस कारणे पुढे आली नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून भूकंप बाबतची धास्ती कायम आहे
Source link
हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का:3.5 रिश्टर स्केलची नोंद; जीवित किंवा वित्तहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण