![]()
प्रतिनिधी |सिल्लोड सिल्लोड–सोयगाव तालुक्यात प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून प्रदीर्घ काळ जनतेची सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा सेवापूर्ती व सेवा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी पार पडला. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अब्दुल सत्तार होते. यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पोलीस उपाधीक्षक शेषराव उदार, जलसंपदा विभागाचे उपअभियंता राजधर दांडगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप फुलारी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता उमेश लिंबारे, सहायक महसूल अधिकारी शिवाजी सोनवणे तसेच पोलीस विभागातील एएसआय सुरेश तायडे या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत सिल्लोड–सोयगाव तालुक्याच्या विकासात आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यात त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगत आमदार सत्तार यांनी सर्व अधिकाऱ्यांना निरोगी, आनंदी व सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, जयराम चिंचपुरे, फिरोज पटेल, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Source link
सिल्लोडमध्ये सेवानिवृत्त शासकीयअधिकाऱ्यांचा सेवागौरव सोहळा:कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला अधिकाऱ्यांचा सत्कार