![]()
राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपापले मोहरे मैदानात उतरवले असून, १७ मतदारसंघांतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांनी अर्ज भरल्याने चुरस वाढली असली, तरी मुख्य मुकाबला हा महायुती विरुद्ध मविआ असाच रंगणार आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ११ जागांवर आपले उमेदवार रिंगणार उतरवले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ४ जागांवर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवत आहे. विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ८ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना (यूबीटी) ६ जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर नशीब आजमावत आहे. १७ मतदारसंघातील प्रमुख लढती, आमने-सामने कोण? काही जागांवर ‘पेच’ आणि बंडखोरीचे आव्हान अनेक मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने आणि स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमध्ये रायगड, छत्रपती संभाजीनगर-जालना, यवतमाळ, पुणे, नाशिक, परभणी आणि नांदेड या ८ जागांवर नाराजांनी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे. नाशिकसारख्या ठिकाणी मविआचा अधिकृत उमेदवार नसल्याने पेच निर्माण झाला आहे. ४ जूनकडे सर्वांचे लक्ष अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आणि नाराज नेत्यांनी अर्ज भरल्यामुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. ४ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने, त्या दिवशी बंडखोरी शमवण्यात नेत्यांना किती यश येते, यावरच विजयाचे समीकरण अवलंबून असेल. खरी लढत पक्षीय चिन्हांवर असली, तरी स्थानिक पातळीवरील गणिते या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत.
Source link
विधान परिषदेची रणधुमाळी:17 जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; महायुती आणि मविआत होणार थेट लढत; आमन-सामने कोण?