Headlines

गोपालनाथ महाराजांच्या ‘शिरोमणी सार’ ग्रंथाचे प्रकाशन:325 व्या जन्मोत्सवानिमित्त ‘वेदांत शिरोमणी’ ग्रंथातील ओव्यांवर आधारित




अठराव्या शतकात क्षेत्र त्रिपुटी (जि. सातारा) येथे संजीवन समाधी घेतलेले (1766) योगी सत्पुरुष गोपालनाथ महाराज यांच्या सव्वा तीनशेव्या (त्रि. शतकोत्तर रौप्य महोत्सवी) जन्मोत्सवानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवार 8 जून 2026 रोजी सायं. 5 वाजता गोपालनाथ महाराजांच्या ‘वेदांत शिरोमणी’ या ग्रंथामधील निवडक ओव्यांवर आधारित ‘शिरोमणी सार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नाथ महाराज व त्यांच्या शिष्यांच्या निवडक रचनांवर नामवंत कलाकारांनी गायलेल्या सी. डी. चे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती त्रिपुटी देवस्थानचे मठाधिपती गुरुनाथ महाराज घोलप, बालगंर्धव संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर , सुधीर महाराज घोलप आणि सुनील महाराज घोलप यांनी दिली. या सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी न्यास, अयोध्या यांचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी, सुर्जी अंजनगाव (अमरावती) येथील संत देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ तसेच विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर उपस्थित राहाणार आहेत. गोपालनाथ महाराज व त्यांच्या शिष्यांच्या काही रचना बकुल पंडित, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, मंजुषा कुलकर्णी– पाटील, रघुनंदन पणशीकर, अस्मिता चिंचाळकर, रविंद्र कुलकर्णी, मंगेश घाटपांडे व सुरेश साखवळकर या कलाकारांनी गायल्या असून त्याला अजय पराड यांनी संगीत दिलेले आहे. हे सर्व कलाकार कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या भक्तीरचना सादर करणार असून सर्वांसाठी खुल्या असणा-या या सोहळ्याचा लाभ रसिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मठाधिपती गुरुनाथ महाराज घोलप यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *