![]()
शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवना ते जळकीबाजार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, अवघ्या दोन वर्षात दोन कोटींचा रस्ता खड्डेमय झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, ढिसाळ नियोजन आणि प्रशासनाने केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रस्त्याची अक्षरशः चा
.
या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे वाहनचालक, शेतकरी व नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे उघड दिसत असले तरी संबंधित विभाग कारवाई साठी पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढा मोठा निधी खर्च होऊनही रस्त्याची अशी अवस्था कशी झाली? याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नवीन रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे ५ वर्षे देखभाल ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असते. या कालावधीत रस्त्यावर खड्डे, पकिंवा नुकसान झाल्यास ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने दुरुस्ती करणे अपेक्षित असते असा नियम आहे. दरम्यान, २०२३ मध्ये काम पूर्ण झाले, त्यानंतर काही महिन्यात रस्ता उखडायला सुरुवात झाली, मिरची वाहून नेताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे ग्रामस्थ जाकीर तडवी यांनी सांगितले. रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शिवना ते जळकीबाजार रस्त्यावर खड्डे पडल्याने कसरत होत आहे. रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार
रस्ता कुठेही खराब झालेला नाही. मी अनेक वेळेस या रस्त्यावरून प्रवास केलेला आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारी असतील तर पाहणी करण्यात येईल. त्यानंतर संबधितांना सुचना देण्यात येतील. – पी. टी चौधरी, अभियंता, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर