![]()
श्रीरामपूर आणि विशेषतः बेलापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ‘ड्रोन’मुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी अचानक दिसणाऱ्या या ड्रोनचा संबंध थेट चोरी करणाऱ्या टोळ्यांशी जोडला जात असू
.
या गंभीर समस्येवर बेलापूरच्या ग्रामसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर घिरट्या घालणारे हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत? ते कोणत्या उद्देशाने फिरवले जात आहेत? आणि यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. ड्रोनच्या या वाढत्या सुळसुळाटाबाबत प्रशासनाने तत्काळ अधिकृत खुलासा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक स्तरावरून देण्यात आला आहे. नागरिकांमधील वाढता संताप आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, या समस्येचे निवारण करण्यासाठी तातडीने विशेष बैठकही घेण्यात आली. या संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री आकाशात दिसणारे ड्रोन आणि चोरांच्या टोळ्यांचा परस्परांशी कोणताही संबंध नसून, या केवळ अफवा असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांची सुरक्षा आणि भीती लक्षात घेता, येत्या काही दिवसांत विनापरवाना फिरणारे हे संशयास्पद ड्रोन पाडण्याची कडक कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संजय गांधी निराधार कमीटीचे अध्यक्ष शरद नवले, अभिषेक खंडागळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, अल्ताफ शेख, सचिन वाघ, पोलीस पाटील शिवाजी भोसले, पत्रकार विष्णुपंत डावरे आदिंची मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, बाळासाहेब दानी विलास थोरात आदी उपस्थित होते.
मुख्य समस्या आणि वस्तुस्थिती रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर फिरणाऱ्या ड्रोनमुळे महिला व बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर या ड्रोनचा संबंध चोरीच्या घटनांशी जोडला जात आहे. त्यामुळे रात्री अनेक नागरिकांची झोप उडाली आहे. चोरट्यांची टोळी तर ड्रोन उडवत नाही ना? अशी भीती नागरिकांत आहे.