![]()
जागतिक तंबाखूमुक्त दिना चे औचित्य साधून ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोलाच्या वतीने शहरात भव्य “नशामुक्ती अभियान‘ राबवण्यात आले. अमरावती ग्रुप अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. यात अकोला येथील श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या (आरडीजी) विद्यार्थिनींनी सादर केलेल्या जिवंत पथनाट्याने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. एन. शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या जनजागृती फेरीत कॅडेट्सनी फलक, बॅनर्स आणि घोषणांच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. कॅप्टन डॉ. श्वेता मेंढे आणि सुबेदार गवई यांनी या फेरीचे नेटके संयोजन केले होते. आर. डी. जी. महाविद्यालयाचे अध्यक्ष दिलीपराजजी गोयनका आणि प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले यांनी कॅडेट्सच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करत, केवळ एक दिवस नव्हे तर वर्षभर हे अभियान चालवण्याची गरज व्यक्त केली. तंबाखूने कर्करोगासारखा आजाराचा गंभीर धोका मुखाचा (तोंडाचा) कर्करोग होण्यामागे तंबाखू आणि गुटखा हेच मुख्य कारण असून, सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास व व्यसन सोडल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी तंबाखू सेवनामुळे सुमारे १३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, दररोज ५ हजारहून अधिक तरुण या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
Source link
एनसीसी कॅडेट्सकडून तंबाखूविरोधात प्रबोधन:राधादेवी गोयनका महिला काॅलेजचा उपक्रम