Headlines

वारकरी संप्रदायाने माणसातील ईश्वराला जागे केले- अब्दुल जावेद:कन्नड शहरात आषाढी एकादशीनिमित्त राबवले विविध उपक्रम‎




वारकरी संप्रदायाने जाती-धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणसातील ईश्वराला जागे केले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि सलोखा हाच आषाढी एकादशीचा खरा संदेश आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अब्दुल जावेद यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त पिशोर नाका येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्नेहमिलन, वारकऱ्यांचे स्वागत व खिचडी वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड होते. यावेळी १ क्विंटल खिचडीचे वाटप करण्यात आले. मुख्याधिकारी रवींद्र लांडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने, माजी उपनगराध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील, संदीप घोंगते आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजू शेख यांनी केले, तर आभार गोकुळ राठोड यांनी मानले. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साधना पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढली. यामध्ये वृक्ष वाचवा, पर्यावरण जपा असा संदेश देण्यात आला. डॉ. टी. एस. पाटील इंग्लिश स्कूल नरसिंगपूर येथे मुख्याध्यापक नरेंद्र पवार यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माऊली व तुकाराम चव्हाण या भावंडांनी हरिपाठ तर विद्यार्थिनींनी भक्तिगीते सादर केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, सचिव टी. एस. कदम संख्येने उपस्थित होते. विविध ठिकाणी फराळ वाटप दुसरीकडे, एचडीएफसी बँकेसमोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव व मित्रमंडळातर्फे फराळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच अंधानेर फाटा येथील संताजी कॉम्प्लेक्ससमोर जि. प. सदस्या डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, माजी आमदार उदयसिंग राजपूत व अब्दुल जावेद यांच्या उपस्थितीत भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *