![]()
हिंगोली, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकच्या सुरगणा तालुक्यात ४, दिंडोरीत २ तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात शनिवारी सकाळी हादरे बसले. त्यानंतर सुमारे १० तासांनी हिंगोली िजल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शनिवारी सायंकाळ
.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याची मालिका सुरू होती. अचानक जमिनीतून गडगडाट होऊन मोठा आवाज होत होता. त्यानंतर भूकंपाची मालिका सुरू झाली. मागील सहा वर्षांत सुमारे ३६ वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा भूकंप ४.६ रिश्टर स्केलचा नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही भूकंपामुळे जमिनीला हादरा बसला आहे.
भूकंपाचे केंद्रबिंदू आता वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतून कळमनुरी तालुक्याकडे सरकत असल्याचे आजच्या भूकंपावरून दिसून येते. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात शनिवारी सकाळी ९.५५ ते दुपारी १२.१० या कालावधीत भूकंपाचे सलग चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचदरम्यान दिंडोरी तालुक्यातील भनवड परिसरातही दोन सौम्य धक्के जाणवले.
डहाणू तालुक्यात ३.१ रिश्टर स्केलचे धक्के
पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असतानांच काही भागांत शनिवारी सकाळी १०:५७ वाजता ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील गंजद परिसराच्या आसपास होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही, अशी माहिती पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली.
सुरगणा तालुक्यात असे जाणवले हादरे पहिला धक्का…… सकाळी ९.५५ वाजता तीव्रता ३.० रिश्टर दुसरा धक्का…… सकाळी १०.०१ वाजता तीव्रता २.२ रिश्टर तिसरा धक्का…… सकाळी १०.०२ वाजता तीव्रता २.० रिश्टर चौथा धक्का…… दुपारी १२.१० वाजता तीव्रता २.५ रिश्टर दिंडोरी (भनवड) दोन सौम्य धक्क्यांची नोंद