![]()
बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’व
.
पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४
अनावश्यक खर्च टाळावा या बैठकीत लग्नाशी संबंधित दोन मुख्य विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या काळात वाढत असलेले ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ टाळावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे. तसेच, लग्नामध्ये प्रतिष्ठेपायी अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी ५० हून अधिक पदार्थ करण्याऐवजी कमीत कमी आणि मोजकेच पदार्थ करावेत, असा ठराव झाला.
समाजाचा विकास होईल ^ समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करणे ही काळाची गरज आहे. बहुतांश लग्नसमारंभात वारेमाप खर्च केला जातो. परिस्थिती नसलेल्यांना त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नातील दिखावा कमी करून आपण जर त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, तर समाजाचा खरा विकास होईल. – गोपालजी वर्मा, अध्यक्ष, युवा मंच