![]()
तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या
.
८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता. यात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली. पंच म्हणून अतुल लगड, अशोक चोभे, बापूसाहेब गुंजाळ, भगवान लगड, बाळासाहेब लोखंडे, विष्णू घाणमोडे यांनी काम पाहिले. विजेत्या मल्लांना बक्षीसे वाटप नियोजन उपसरपंच शंकर मोरे, माजी उपसरपंच तुकाराम दाताळ, बापूराव चोभे, अक्षय लगड यांनी पार पाडले.
रात्री ९ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन मागील वर्षीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त प्रिती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील महिला आणि यात्रेसाठी उपस्थित पाहुण्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील काही दात्यांनी या कार्यक्रमात विजेत्यांना दिलेल्या गृहोपयोगी वस्तू बक्षिसाचे प्रायोजकत्व करून सहकार्य केले. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच बी. एस. लगड यांनी केले. यावर्षी या कार्यक्रमात आश्लेषा कोरडे यांनी विजेतेपद पटकवले.
यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमेटीने परिश्रम घेताले. दोन्ही दिवस यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे चिचोंडी पाटील बीटचे पोलिस हवालदार शैलेश सरोदे आणि पोलिस हवालदार महेश भवर यांना बंदोबस्त ठेवला. यावेळी नगर जिल्ह्यातील भाविकांनीही ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गावात मोठी गर्दी केली होती. यात्रा उत्सवामुळे गावात नवचैतन्य उत्सवामुळे गावात नवचैतन्य आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्येही वेगळाच उत्साह जाणवत होता. या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आठवड गाव भाविकांच्या गर्दीने गजबजले होते.