Headlines

वरूड परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी:आ. चंदू यावलकरांच्या हस्ते केले जाणार उद्घाटन‎




येत्या २१ जून रोजी होऊ घातलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाच्या निमित्ताने वरूड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. या जागतिक महोत्सवात वरूडकरांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी गिरिधर देशमुख यांनी केले आहे. या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचे उद्घाटन आ. चंदू यावलकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष ईश्वर सलामे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, मुख्य अधिकारी गजानन भोयर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रभारी गिरिधर देशमुख यांनी नुकतीच ‘स्वामी रामदेव बाबा योग केंद्र’ आणि ‘निसर्गरम्य योग केंद्र’ला भेट देऊन योगसाधकांना मार्गदर्शन केले. तसेच, तालुका महिला प्रभारी नम्रता साबळे यांनीही स्वामी रामदेव बाबा योग केंद्राला भेट देऊन शिबिरार्थी महिलांना योगाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. या पूर्वतयारी दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात आले. निसर्गरम्य योग केंद्र येथे योगसाधक मोहन बोरकुटे यांचा, तर स्वामी रामदेव बाबा योग केंद्र येथे योगशिक्षिका नीता पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निसर्गरम्य योग केंद्राचे योगशिक्षक राम डोंगरे, बाळासाहेब पाटील, गोपाल मालपे, सुभाष शेळके, नंदकिशोर घोरमाडे, रमेश ब्राम्हणे, अरविंद यावले, जयकुमार गाडगे, जावळे, लीलाराम मेंघाणी यांच्यासह अनेक साधक उपस्थित होते. तसेच स्वामी रामदेव बाबा योग केंद्रात योगाभ्यास करणाऱ्या महिला साधक डॉ. प्रांजली कुऱ्हाडे, भाविक गावंडे, लता दाते, शीतल पाटील, माधुरी बिडकर, हर्षा खेडकर, जयश्री आचार्य, हेमा चिमोटे, अर्चना खेरडे, स्नेहल गावंडे, मीना चौधरी, सविता पाचघरे, उमा कोल्हे, वंदना जाने, अर्चना शिरभाते, अश्विनी जाधव, ज्योती डकरे, मीनल दवंडे, भावना नेरकर व इतर महिलांनी उपस्थित राहून आगामी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्याचा संकल्प केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *