Headlines

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय




पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्लांटस्वर तातडीने कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. नगरसेवक हरिदास चरवड यांनी वडगाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्लांटस्मुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने कारवाई करावी. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी असलेले हे प्लांटस् हलवावेत असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. यावर आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेले आरएमसी तसेच डांबर प्लांटवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच नजीकच्या काळात शहराच्या हद्दीवर लोकसंख्या कमी असलेल्या भागांमध्ये हे प्रकल्प हलवण्याबाबत खाजगी व्यावसायीकांना देखिल आवाहन करण्यात येणार आहे. महापालिकेचा देखिल येरवडा येथे डांबर प्लांटस् आहेत. लवकरच हे डांबर प्लांटस् देखिल शहराच्या हद्दीवरील चार कोपर्‍यांमध्ये विभागण्यात येतील. यासाठी जागांचा शोध सुरू असून शिंदेवाडी जकातनाका आणि वाघोली येथील जागेत नव्याने प्लांटस उभारण्याची पुढील सहा महिन्यांत कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, असे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.|



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *