Headlines

कन्नडमधून 50 किमीचा महामार्ग; 3 उड्डाणपुलांची कामे 2 वर्षांपासून अपूर्ण:गुत्तेदाराकडून काम बंद, रस्ता खोदल्याने धुळीमुळे गैरसोय‎




कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग प्रारंभापासूनच प्रशासकीय उदासीनतेमुळे गैरसोयीचा ठरत आहे. दक्षिण भारताला जोडणारा व पाच राज्यांच्या दळणवळणासाठी असलेला हा महामार्ग ४५० किलोमीटरचा आहे. कन्नड तालुक्यातून हा मार्ग ५० किमीपर्यंत जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून निधीअभावी तालुक्यात ३ उड्डाणपुलांची कामे अपूर्ण स्थितीत आहे. कन्नड हद्दीच्या सुरुवातीला गल्लेबोरगाव, कन्नड शहर, अंधानेर फाटा या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही कामे संथगतीने सुरू असल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. या रस्त्यासाठी शेकडो एकर शेतजमीन संपादित करण्यात आली. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला देण्यात आला. रस्ता बांधणीवर पैसा खर्च झाला. मात्र, सद्यस्थितीत हा रस्ता कुठेही सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. महामार्ग पूर्ण झाल्याचा दावा करत टोल वसुली सुरू केली. मात्र, कन्नड औट्रम घाटातील प्रस्तावित भुयारी मार्ग अद्यापही कागदावरच आहे. महामार्ग सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी उड्डाणपुले मंजूर केली आहेत. अमरीश मानकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुलाच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद, एकेरी झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी धुळीमुळे वाहनचालकांना समोरील रस्ता दिसणे कठीण झाले आहे. सर्व पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री वाहनचालकांना रस्त्याचा, धोकादायक वळणांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत. चुकीची वळणे, बंद पथदिवे यामुळे रस्ता ओळखणे अशक्य होते. अपघात होत असल्याचे नगरसेवक अब्दुल जावेद यांनी सांगितले. अर्धवट कामामुळे आतापर्यंत अपघातांत ३० जणांचा बळी गेला आहे. ६० जण गंभीर जखमी झाले आहेत. विविध अपघातांत ३० जणांनी गमावला जीव पुलाच्या कामासाठी केले रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *