![]()
चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीच्या युवा विद्यार्थ्यांसह आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला. पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे शहरात यापूर्वीही मोठे आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करण्यात आला असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच या आंदोलनामागची भूमिका होती. त्यामुळेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला नैतिक यश मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी सागर तंबाखे, नितीन गवळी, मेहमुद हुसेन, प्रा. प्रसेनजित तेलंग, विनोद जोशी, गजानन यादव, सागर गावंडे, भूषण नाचवणकर, प्रा. रवींद्र मेंढे, सेजल मेंढे, सानिया सदफ, चरण जोल्हे, चेतन भोले, विनोद लहाने, भीमराव बेराड, शेख हसन, सैय्यद अजमत, मंगेश डाफ, अरूण देवगिरकर, गजानन पेठे, गणेश होले, स्वप्निल डोळस, प्रमोद गवई, ॲड. लौकिक डोंगरे, पंकज घोरपडे, जीवन दुर्योधन, समीर मकेश्वर, आर्यन मोटघरे, हार्दिक सोनोने, मयूर सवाई, आशिष सोनोने, रोहन गजभिये, प्रज्वल घाटोळे, धीरज गजभिये, आकाश जवंजाळ, शिमोन तानोले, रोशन गिरी, साहिल डोंगरे, अविजीत गोसावी, सिद्धांत करवाडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली