![]()
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, आषाढी यात्रेसाठी पूर्वीच पालखी मार्ग, तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्तांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या. यातील ८० टक्के कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. पाल
.
यात्रेच्या पूर्वतयारीबाबत दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सीईओ कुशल जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे,, मुख्याधिकारी महेश रोकडे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, आषाढी च्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी विविध कामे करण्यात येतात. विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता असल्याने काही कामांच्या निविदाबाबत निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे. त्यामुळे आवश्यक सर्व कामे पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी मुरमीकरण करण्यात येणार आहे. वाढीव पालखी तळाबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. पालखी मार्गावर व तळांवर सुलभ शौचालय, स्नानगृह, वॉटरप्रूफ मंडप, रुग्णवाहिका आदींची संख्या वाढविण्यात येणार आहे. . पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणी पालकी तळ कमी पडत आहेत; त्यामुळे ते तळ वाढवून देण्यात यावेत. . पालखी सोहळ्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. . टँकरची संख्या वाढवावी. . पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. पालखी मार्गावरील पेट्रोल पंपांवर सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना पेट्रोल/डिझेल उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना तात्काळ सूचना देण्यात येणार असून गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येईल. पालखी सोहळ्यासह वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या पूर्णिमेला श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात दाखल होतात आणि सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात येतात. यावेळी संत देव भेट सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रथा-परंपरेनुसार योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
इंधन आणि गॅस पुरवठा राहणार सुरळीत
सोहळा प्रमुखांच्या विविध मागण्या व सूचना
कामांना निवडणूक आयोगाची परवानगी; वारीपूर्वी कामे होणार