Headlines

Matru Shakti procession on the occasion of Ahilyadevi Holkar Jayanti; Study class concluded



विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने शहरातील महेश भवन, जुना आरटीओ रोड येथे २८ ते ३१ मे या कालावधीत मातृशक्ती आयामचा प्रांतीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गात विदर्भ प्रांतातील २६ जिल्ह्यांमधून सुमारे २०० महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग

.

मलकापूर ग्रामपंचायत परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा बसेरा कॉलनीमार्गे गायत्री बालिकाश्रमपर्यंत काढण्यात आली. गायत्री बालिकाश्रम येथे शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत सहभागी महिलांनी विविध वीरांगनांच्या वेशभूषा परिधान करून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. संस्कृती रक्षणाचाही संदेश दिला. यावेळी दंड, यष्टी आदींची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शोभायात्रेमुळे परिसरात उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात विश्व हिंदू परिषदेच्या क्षेत्रीय व प्रांतीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. संघटनात्मक ध्येय, राष्ट्रसेवा, संस्कृती संवर्धन, महिला सक्षमीकरणवर चर्चा करण्यात आली.

समारोप कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद क्षेत्र संयोजिका प्रतिभा बोथारे, गोदावरी बंड, उत्कर्ष शिशुगृहाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश लढ्ढा, गायत्री बालिकाश्रमच्या अध्यक्षा मीरा जोशी उपस्थित होते. या अभ्यास वर्गाच्या आयोजनासाठी प्रांत सहमंत्री गणेश काळकर, मातृशक्ती प्रांत संयोजिका लीना सोइंदे, दीपाली गंगावणे, अनिता काकड, मीना तडोकार, सीमा दातीर, शिल्पा राजवैद्य, नेहा दुबे, कल्पना पाठक, गोपाल राजवैद्य आदींनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *