- Marathi News
- National
- Armed Assailants Kill Three People, Including Church Secretary And Pregnant Wife, Indiscriminate Firing In Early Morning Attack, Seven Houses Burnt In Manipur
सत्यनारायण मिश्र | इंफाळ3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

मणिपूरच्या कांगपोकपी येथे शुक्रवारी पहाटे सशस्त्र हल्लेखोरांनी एका गावात बेछूट गोळीबार केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. घटनेच्या वेळी सर्व जण झोपलेले होते. मृतांमध्ये चर्च सचिव लेत्खोंगम हाओकिप, त्यांची गरोदर पत्नी तिन्मैरी व आणखी एक व्यक्ती जांगमिन्लाल यांचा समावेश आहे. हल्ल्यादरम्यान ७ घरेही जळून खाक झाली. तिन्मैरी सात महिन्यांच्या गरोदर होत्या.
अधिकाऱ्यांनुसार, हा हल्ला पहाटे ४ वाजता सैतू-गाम्फाजोल उपविभागातील लोइबोल खुल्लेन गावात झाला. विरोधी गटांमध्ये काही मिनिटांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. यानंतर ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात पळून गेले. सूत्रांनुसार, कुकी लिबरेशन आर्मीने (केएलओ) कुकी नेशनल फ्रंटवर (पी) हल्ला केला. मृत पती-पत्नी चर्च व सामाजिक सेवेसाठी स्थानिक ख्रिश्चन समाजात आदराने पाहिले जात होते. हल्ल्यात एनएससीएन-आयएम व जेडयूएफ(के) च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
सीआरपीएफ डीजी मणिपूरमध्ये
मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी सीआरपीएफचे डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली. सिंह मणिपूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.