![]()
शहरातील जामनकर नगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या तेजस गायकवाड या तरुणाच्या हत्याकांडाचा थरारक खुलासा पोलिसांनी केला आहे. केवळ संशयावरून मित्रांनीच मित्राचा घरात घुसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “सचिन उर्फ येडा” राठोड याची टीप मारेकऱ्याला दिल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून हा थरकाप उडवणारा “गेम” झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रोहन इंगळे (वय 28, रा. संकट मोचनरोड), हर्षल उर्फ टोबू मसराम (वय 20,रा. शिंदेनगर) आणि प्रणय गुंजाळ (वय 22, रा. शिंदेनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत तेजस गायकवाड आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. मात्र, सचिन उर्फ येडा याच्याशी संबंधित गोपनीय माहिती (टीप) तेजसनेच लीक केल्याचा संशय आरोपींच्या मनात बळावला होता. गुरुवार, दि. 4 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास, याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी थेट तेजसच्या घरात प्रवेश केला. काही समजण्याच्या आतच धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वारकरून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अवधूतवाडी पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना सायंकाळीच नेर येथून ताब्यात घेतले. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी,नशेखोराची संख्येत वाढ जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. यामागे “नशा” हे सर्वात मोठे कारण समोर येत आहे. शहरासह ग्रामीण भागात एमडी ड्रग्स, गांजा, अवैध दारू आणि इतर अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या जीवघेण्या नशेच्या आहारी जाऊन तरुण पिढी रसातळाला चालली आहे. नशेतून विवेक हरपल्यामुळे क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये होत आहे. मागील पाच महिन्यांची धक्कादायक आकडेवारीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशःधिंडवडे काढले आहेत. भरदिवसा होणारे खून, टोळीयुद्ध,घरगुती वाद वाढले आहेत. तीनही आरोपींना पाचदिवस पोलिस कोठडी नेर येथून ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही संशयित आरोपींना अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयासमोर या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोण, हत्येसाठी वापरलेली धारदारशस्त्रे कोठून आणली आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढदिवसाची “ती” स्टोरीठरली मृत्यूचे कारण - पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तेजसच्या हत्येच्या अवघ्या एक ते दोन दिवसांपूर्वी ”सचिन उर्फ येडा” याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्यसाधून मुख्य मारेकरी रोहन इंगळे याने सोशल मीडियावर एक स्टोरी ठेवली होती. यामध्ये त्याने “सचिन,तुला वाढदिवसाचे गिफ्ट लवकरच पाठवतो” असा थेट आणि संशयास्पद उल्लेख केला होता. रोहनने दिलेल्या या “गिफ्ट”च्या धमकीचा रोष तेजस गायकवाड याच्या गेम प्लॅनिंगकडेच होता, हे आता स्पष्ट झाले असून ही सोशल मीडिया स्टोरी तेजससाठी मृत्यूचे कारण ठरली.
Source link
"सचिन उर्फ येडा''ची टीप दिल्याचा संशय; मित्रांकडूनच तेजसचा खून:यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; पाच महिन्यांत 30 खून अन् 47 खुनाचे प्रयत्न