![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रॅली काढून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वे विभाग व मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी रॅली काढून पर्यावरण रक्षण व प्लास्टिकचा वापर टाळण्यासह वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये रेल्वे विभागाचे स्टेशन प्रबंधक नरेश वानखडे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश महल्ले, शुभम जाधव (ओ. एस.), आरपीएफ योगेश ठाकरे, दीपक शर्मा (टी. आय.) तसेच मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विलास नसले, रोहित सोळंके, दिनेश श्रीवास, विलास वानखडे, संतोष माने, सुरेंद्र भेलोंडे, दिपक खंडारे, सुनील भोजगडिया, रवी चव्हाण, जितेंद्र चौबे, सुनील वानखडे, गजानन चव्हाण, सोहन सरवरे, रितेश सबाजकर, रमेश दर्यानी, व्यंकटेश तिवारी, कार्तिक व्यास, दिगंबर सदार, समाधान इंगळे, सुरेंद्र गायगोले, सोनू सासे आदींचा सहभाग होता.उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. प्लास्टिकच्या पिशव्या व इतर वस्तूंच्या अतिवापरामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी व पुनर्वापरयोग्य पर्यायांचा अवलंब करण्यासाठी प्रवासी व नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. प्लास्टिक पिशव्या, बॉटल्सचा वापर टाळा प्लास्टिकच्या पिशव्या व बॉटल्सचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने किमान झाड लावून त्याचे संगोपन करावे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. रॅलीच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती करत स्वच्छता तसेच हरित पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जनजागृती रॅलीमध्ये “स्वच्छ पर्यावरण- निरोगी जीवन’, “प्लास्टिकमुक्त भारत’, प्लास्टिक हटाव धरती बचाओ आदी घोषणा देण्यात आल्या. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, हरित जीवनशैलीचा संदेश समाजात पोहचवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
Source link
मूर्तिजापूर येथे पर्यावरण दिनी जनजागृती:प्रवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप, नागरिकांना मार्गदर्शन