![]()
महाराष्ट्रात रेव्ह पार्टीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्याला काही लोकं पाठिंबा देत आहेत. तरुण मुले अशा पार्ट्यांना जातात अशाने तरुण पिढी बर्बाद होत आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर मकोका लावला पाहिजे, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निदा खान प्रकरण काही नाशिकपुरते मर्यादित नाही. माजी खासदार जलील यांना अटक केल्याशिवाय या प्रकरणात पुढे काहीच सापडणार नाही. त्यानेच मतीन पटेल यांच्याकडे निदा खान यांना पाठवले होते, असे सुद्धा शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, कंत्राटदार काम घेतात आणि ते दुसऱ्या कंत्राटदाराला देतात. दोघांनी आपला नफा काढल्याने ते काम चांगले होत नाही. मुख्यमंत्र्यांना मी याबाबत माहिती दिली आहे. ते यावर कारवाई करणार आहेत. युद्धामुळे गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेल बंद झाले तरच या किंमती वाढणे बंद होणार नाही. संजय राऊत हे घरी बसून सर्व काही बोलत असताना त्यांना वस्तूस्थिती माहिती नाही. पराभव झाला की EVM चे कारण पुढे करतात संजय शिरसाट म्हणाले की, लोकसभा ते मनपा निवडणूक झाली आता विधान परिषद निवडणूक होत आहे. प्रत्येक निवडणूक झाल्यावर मविआचा पराभव झाल्यावर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी विधाने मविआच्या नेत्यांकडून केली जातात. या संदर्भात ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले. निवडणूक आयोगाने तिथे सर्व पुरावे सादर केले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यांच गोष्टी लोकांसमोर आणणे. आणि सर्व EVM वर ढकलण्याचे काम संजय राऊत करत आहे. त्यांनी संघटन कमी पडतंय हे मान्य केले पाहिजे. मविआत फुट पडल्याने त्यांचा पराभव होत आहे. सुळेंनी पुरावे द्यावे संजय शिरसाट म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याकडे पुरावे दिले आहेत त्यामध्ये मविआतील कोणी पैसे घेतल्याचे त्यांना माहिती असेल तर त्यांनी त्यांची नावे जाहीर करावी. त्यांना थांबवले कोणी आहे? तुमच्याकडे पुरावे असतील तर ते समोर आले पाहिजे. अर्धवट आरोपांना लोकं गांभीर्याने घेत नाहीत. तुमच्यातील बेबनावामुळे हे पराभव झाले आहेत. अधिकाऱ्यांनी राजकारणात पडू नये संजय शिरसाट म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी राजकीय लोकांच्या दबावात येत एकनाथ शिंदेंना निमंत्रण न देण्याचे प्रकार करत असतील तर मी त्यांना ठणकावून सांगतो तुम्ही नौकरीपुरते मर्यादित रहा, राजकारणी होण्याचा प्रयत्न करू नका. तसा प्रयत्न केला तर निश्चितच तुमच्यावर कारवाई केली जाईल. हा प्रश्न मी मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे.
Source link
रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर थेट 'मकोका' लावा!:पराभवाचं खापर 'ईव्हीएम'वर कशाला फोडता? संघटन कमी पडल्याचं मान्य करा, शिरसाटांचा संजय राऊतांना टोला