Headlines

The current government is not in line with the constitution.



आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होत नाही, म्हणूनच ते संविधानाचे नाव घ

.

येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठकीत शनिवारी सायंकाळी लक्षवेधी व शतकवीर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लोकशाही समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सल्लागार कॉ. बाबा आरगडे, ॲड. रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन’ पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड आदी उपस्थित होते.

लोमटे म्हणाले, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि संविधानवादी अशा विविध संघटना वेगवेगळ्या विचारांत विखुरल्या आहेत. अशा विखुरलेल्या अवस्थेत राहून आपण ज्या विचारांचा विरोध करत आहोत, तो करणे शक्य नाही. त्यामुळे समान उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचे असेल तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट टिकवली पाहिजे.” समाजात आणि कुटुंबात लोकशाही, समता, स्वातंत्र्य हे विचार खरोखर स्वीकारले गेले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सद्यस्थितीवर बोट ठेवले.

प्रा. सुभाष वारे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला लाभलेल्या सामाजिक ऐक्याच्या आणि मुकुंदराव पाटलांच्या सत्यशोधकी चळवळीच्या वारशाचा गौरव केला. अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके’चे साडेसहा हजार अंक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आलेल्या या बैठकीच्या उत्कृष्ट नियोजनाचे अभिनंदन केले.

या सोहळ्याला अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारुळे, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, सोशल मीडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, नगर शहराध्यक्ष भारतभूषण भागवत, शहराध्यक्ष विनायक ताकपेरे, शहर प्रधान सचिव ठकाजी जगधने, सतीश केदार, भाऊसाहेब सावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी केले.

आरक्षणावरून जाती-जातींमध्ये भांडणे “सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने जाती-जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपण महापुरुषांची नावे घेतो, पण आपापसातच लढतो आहोत. शिल्लक असलेल्या भाकरीचे वाटे सत्ताधारी करत आहेत; मात्र टोपलीतील भाकरीची संख्या वाढल्याशिवाय कोणाचेच पोट भरणार नाही, हे कोणी लक्षात घेत नाही,” असे सांगत लोमटे यांनी सर्व पुढारी आणि गट-तटांना एकत्र करून यावर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *