![]()
अतिक्रमणांच्या विळख्यात अडकून आपला नैसर्गिक प्रवाह गमावलेल्या सीना नदीला आता लवकरच मोकळा श्वास मिळणार आहे. “सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आ
.
शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. “गेल्या काही वर्षांत नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने नदीचे मूळ पात्रच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप जपून नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक जागा विकसित केल्या जातील, असेही विखे यावेळी म्हणाले.
सीना नदीचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे, नव्याने होणार सर्वेक्षण शहरातील अनेक नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणामुळे थांबले असून, याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. हे नाले प्रवाही व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाईल. मनपाचे सांडपाणी १०० टक्के प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडले गेले पाहिजे, अन्यथा नदी स्वच्छ करूनही उपयोग होणार नाही. यासाठी सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता कमी असल्यास, महापालिकेला आवश्यक त्या सुविधा आणि वाढीव प्रकल्पासाठी सरकार स्वतः तरतूद करेल, अशी ग्वाही विखे यांनी दिली.