.

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील तिसरे नेते ठरणार आहेत.
डॉ. मा. प. मंगुडकर यांच्या दोन आणि प्रभाताई झाडबुके यांच्या एका अशा एकूण तीन कार्यकाळांनंतर आता राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून बार्शीला विधान परिषदेत चौथ्या टर्मचे प्रतिनिधित्व मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. राऊत यांचा विजय झाल्यास ते विधान परिषदेवर पोहोचणारे बार्शी तालुक्यातील तिसरे नेते ठरतील. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत बार्शीच्या प्रतिनिधित्वाचा इतिहास पुन्हा एकदा उजळून निघत असून, राऊत यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ^(स्व.) प्राचार्य डॉ. मा. प. मंगुडकर हे माझे मामा होत. ते मूळचे भातंबरे (ता. बार्शी) चे होते. काँग्रेसकडून ते १९६६ व १९७२ असे सलग दोन टर्म विधानपरिषद आमदार होते. सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. – डॉ सारंग रामधवे, धाराशिव डॉ. माणिकराव पद्मण्णा मंगुडकर यांचा जन्म १७ डिसेंबर १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन, चिंतन आणि सामाजिक प्रश्नांची आवड होती. त्यांच्या कुटुंबातील संस्कारांमुळे त्यांच्यात समाजसेवेची भावना विकसित झाली. सोलापूर येथील डि.ए.व्ही महाविद्यालयातून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र घेऊन बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
बार्शी तालुक्यातून विधान परिषदेवर पोहोचणारे पहिले नेते म्हणजे भातंबरे (ता. बार्शी) येथील व पुणे येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि प्राचार्य डॉ. माणिक पद्मण्णा मंगुडकर. काँग्रेसकडून ते १९६६ व १९७२ असे दोन वेळा सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून गेले. एकदा बिनविरोध व दुसऱ्यांदा ८६ टक्के मते मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाने निवडून आले. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे १९६२ ते ७२ या काळात दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेसच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांना काँग्रेसने १९७८ मध्ये सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आणले आणि १९८४ पर्यंत सदस्य म्हणून कार्यरत राहिल्या.