.

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हे प्रकरण सध्या बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी अकोल्यातील भूखंड माफियांची टोळी चर्चेत आली आहे.
संत गजानन महाराज यांच्या प्रेरणेने स्थापित मोठे श्रीराम मंदिर कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पुरातन असलेले हे मंदिर श्रीराम व हरिहर संस्थानकडून संचालित असून, संस्थानच्या जमिनी आहेत. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक, समाजिक उपक्रम राबवण्यात. रिधोरा परिसरात संस्थानची सुमारे १२ एकर जमीन आहे. ही जमिन वाहितीसाठी देण्यात आली होती. मात्र आता वारसाहक्काने ती ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पुढे आली. जमीन, प्रमाणपत्रप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर प्रशासकीय, फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षा सुमनदेवी अग्रवाल यांनी केली आहे. विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा तसेच महसूल प्रशासनातील अनियमिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जमिनीबाबत महसुली कार्यवाही,खरेदी –विक्री , फेरफार नोंद, हस्तांतरण, ताब्यातील बदल किंवा मालकी हक्काशी संबंधित नोंद करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी आहे.
प्रकरण जैसे थे ^गैरअर्जदारांनी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांची बाजू एकूण घेणे आवश्यक आहे. सध्या प्रकरण जैसे थे आहे. लवकरच सुनावणी होईल. -संतोष यावलीकर, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.
प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
वारसांना शेतीवर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही श्रीराम हरिहर संस्थांकडून मंडळ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. जमिनीची मालकी संस्थानकडे आहे. संबंधित वाहितदराचे निधन झाले. त्यामुळे संबंधितांकडून वारसहक्काने शेतीच्या खरेदीसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. महसूल विभागाकडून हा अर्ज मंजूर करण्यात आला आणि खरेदी प्रमाणपत्रही देण्यात आले.