![]()
मशिदीत नेत एका ७ वर्षांच्या मुलाशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात उमेर शेख (२०, नेहरूनगर) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करून १२ जूनप
.
पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मुलगा १ जून रोजी सकाळी मशिदीजवळील झोका पाहण्यासाठी गेला होता. त्या वेळी परिसरात राहणारा उमेर शेख याने त्याला बोलावून मशिदीच्या आत नेले. आरोपीने त्याला मांडीवर बसवले. त्यानंतर त्याच्याशी अश्लील कृत्य केले. तसेच मुलाला मांडीवर झोपवून घट्ट पकडून ठेवले. या प्रकारामुळे मुलगा घाबरून गेला. काही वेळानंतर आरोपी त्याला मशिदीबाहेर सोडून तेथून निघून गेला. घरी गेल्यावर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे आईने त्याची चौकशी केली तेव्हा पीडित मुलाने घडलेली घटना सांगितली. घटनेबाबत मुलाकडून माहिती मिळाल्यानंतर महिलेने जिन्सी ठाण्यात धाव घेतली. विशेष म्हणजे, मुलाने सांगितलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती. पुढील तपास सहायक निरीक्षक प्रशांत बोडेकर हे करीत आहेत.
आरोपी तरुण रस्त्यावर भटकणारा टवाळखोर
यातील आरोपी उमेर हा मशिदीच्या परिसरात बऱ्याच वेळा फिरत असतो. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्याने फारसे शिक्षणही घेतलेले नसून तो सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे तो भटकत असतो. त्याने एकटा मुलगा पाहून त्याला गाठून हे किळसवाणे कृत्य केले.