Headlines

सोहळ्यात सिंधी समाजातील 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:16 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात येतोय सन्मान‎




समाजातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रशांत प्रतिभा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सिंधी समाजातील १८० गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा कौतुक सोहळा रविवारी सायंकाळी ६ वाजता विद्यानगर परिसरात उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अनुप धोत्रे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अमरावतीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, अकोल्याच्या महापौर शारदा खेडकर, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गावंडे, शहराध्यक्ष अध्यक्ष जयंत मसने, रणजीत खेडकर, नगरसेवक देवाशिष काकड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला अकोल्यातील विविध सिंधी पंचायतींचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यात पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष रमेश जग्यासी, शहर पंचायतचे भेरूमल वाधवानी, मनोहर पंजवानी, सुरेंद्र नागदेव, रमेशलाल आलिमचंदानी, हरीश पारवानी, ओमप्रकाश लालवानी, दीपक लिलवानी, कन्हैयाल रंगवानी, राजकुमार गुलचंदानी आणि प्रकाश आनंदानी आदी उपस्थित होते. आयुषी छाबडिया ‘सुपर टॉपर’ यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आयुषी महेश छाबडिया हिने ९८.९०% गुण मिळवून ‘सुपर टॉपर’ होण्याचा बहुमान पटकावला. तिच्यासह जान्हवी बालानी, ऋतुजा जेठवानी, गीत अरोरा, दिव्या वाधवानी, दिशा विरवानी, हिमांशू खानचंदानी आदी गुणवंतांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *