Headlines

नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंड शमले:अखेर गोकुळ गीते यांची माघार; कुणाल दरडेंचा मार्ग सुकर; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला




नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. गोकुळ गीते यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना) यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या गोटातून वेगवान हालचाली सुरू होत्या. आज राज्याचे मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये गोकुळ गीते यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या नेत्यांसोबत झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर गीते यांनी माघार घेण्यास संमती दर्शवली. पत्रकार परिषदेत केली अधिकृत घोषणा नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी, आपण निवडणुकीतून माघार घेत असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. गोकुळ गीते यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महायुतीच्या गोटात मोठा दिलासा मिळाला आहे. मतविभाजनाचा धोका टळल्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर मानला जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *