- Marathi News
- National
- Ram Temple Donation Controversy, Mahant Said, There Should Be An Impartial Investigation; Politics Flared Up, Former Accounts In charge Had Alleged Irregularities In Donations
अयोध्या/लखनऊ10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अयोध्येतील राम मंदिराच्या दान-देणगीवरून वाद तापला आहे. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमलनयन दास यांनी या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर देणगीत गडबड झाली असेल तर त्याचा निष्पक्ष तपास व्हावा. ते म्हणाले, आज वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी भरलेले आहे. एक पक्ष दुसऱ्यावर आरोप करत आहे. तपास करणाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आणि पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रामजन्मभूमीशी संबंधित प्रकरणात संशय आल्यास तपास आवश्यक आहे, पण सर्वांचा विश्वास बसेल,असा तपास असावा.
याआधी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करून भाजपवर निशाणा साधला. यामुळे राजकारण तापले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले,लोक अखिलेश यादव यांचे आरोप गांभिर्याने घेत नाहीत. सूत्रांनुसार,पंतप्रधान कार्यालयाने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अहवाल मागवला आहे.
अशी घटनाच झालेली नाही : ट्रस्ट सदस्य राव
राम मंदिर ट्रस्टचे सदस्य गोपाल राव यांनी हे प्रकरण फेटाळून लावत म्हटले की अशी घटनाच झालेली नाही. ते म्हणाले, गणना कक्षाजवळ खाजगी एजन्सींसोबत पोलिस आणि सीआयएसएफचे जवान असतात.
शिलापूजन काळापासूनच चोरी : अविमुक्तेश्वरानंद
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, राम मंदिरात शिलापूजनाच्या काळापासूनच चोरी होत आहे. किती आरोप झाले. तिथे चंपत राय बसले आहेत. चंपतचा अर्थच होतो घेऊन पळून जाणे.
राम मंदिर दान वादावर राजकीय आरोप तीव्र
- राम मंदिरात दान व कथित चोरीबाबत मला बरेच माहीत आहे. ते ताकदवान लोक आहेत, वेळ आल्यावर सांगेन. – बृजभूषण सिंह, भाजप नेते
- सत्य समोर आले पाहिजे. जेव्हा प्रकरण कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी जोडलेले असते, तेव्हा पारदर्शकता आवश्यक असते. – विनय कटियार, भाजप नेते
- भाजपचे लोक नेहमीच देणगी चोरांच्या पाठीशी उभे राहिले. ८ महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाल्याबद्दल उत्तर हवे आहे. – संजय सिंह, आप खासदार
- अखिलेश अफवा पसरवत आहेत. त्यांची विचारसरणी बाबरवादी आहे. ते खोटे रचून लोकांना संभ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. – ब्रजेश पाठक, डेप्युटी सीएम, यूपी
वादाची सुरुवात ७ जून रोजी झाली, तेव्हा सपाचे माजी मंत्री पवन पांडेय यांनी राम मंदिर देणगीत ₹५-₹७ कोटींच्या चोरीचा दावा केला. यानंतर अखिलेश यांनी हा मुद्दा लावून धरला व ट्रस्टच्या मौनाला संशयास्पद म्हटले. ९ जून रोजी भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय तपासाची मागणी केली. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी बैठक बोलावली.
माजी अकाउंट्स इन्चार्जचे काय आरोप?: मंदिराचे माजी अकाउंट्स इन्चार्ज महिपाल सिंह यांनी दावा केला की दान संकलनात बऱ्याच काळापासून गडबड होत होती. त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापनाकडे तक्रार केली. पण त्यांना पदावरून हटवले.
इकडे… केरळ हायकोर्टाने सबरीमालात अडिया शिष्टम तूप विक्रीशी संबंधित निधी अपहाराच्या फेरतपासणीचे आदेश दिले. कोर्टाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालावर समाधान व्यक्त केले.