Headlines

राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार:पैसे चोरणारा कोण? संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट हल्ला; अयोध्या दौऱ्याची घोषणा




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल 5 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. हे रामललाच्या चरणी आलेले पैसे वारंवार कोण चोरत आहे?” असा खळबळजनक सवाल उपस्थित करत राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबतच, “आम्ही लवकरच स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहोत,” अशी घोषणाही त्यांनी केली. आम्ही १ कोटी उघडपणे दिले
संजय राऊत पुढे म्हणाले की, “जेव्हा अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले, तेव्हा सुरुवातीच्या काळात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः १ कोटी रुपयांची देणगी दिली होती. देशभरातील अनेक रामभक्तांनी तिथे गुप्तदान केले आहे. मात्र, आता मंदिराच्या पैशांमध्येच भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. एवढा मोठा अपहार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर का गप्प आहेत? तिथले स्थानिक खासदार यावर का बोलत नाहीत?” असा सडेतोड सवाल त्यांनी केला. राम मंदिर आणि शिवसेनेचे नाते
शिवसेना आणि अयोध्याचे नाते जुने आहे. राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर उभारणीपर्यंत शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळीही उद्धव ठाकरे गटाने भाजपवर राम मंदिराचे ‘राजकीयीकरण’ केल्याचा आरोप केला होता. आता थेट दानपेटीतील ५ कोटींच्या अपहाराचा मुद्दा उपस्थित करून संजय राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत म्हणाले- विलीनीकरणावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांसारख्या पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला दिला आहे. भाजपविरोधात एक मजबूत राष्ट्रीय पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेसच्या मूळ विचारसरणीतून बाहेर पडलेल्या सर्व लहान पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षात विलीन झाले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विनंती केली आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेले सर्व छोटे पक्ष पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांच्या मते, आज देशातील विरोधी पक्षांना आपापल्या राज्यात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मदतीची आणि ताकदीची गरज आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि ममता बॅनर्जी यांना संकट काळात काँग्रेसची आठवण आल्याचे सांगत त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांनाही हाच मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *