Headlines

Synthetic drugs are being delivered directly to homes from Mizoram and Myanmar, the northeastern states are becoming a haven for drug addiction.


  • Marathi News
  • National
  • Synthetic Drugs Are Being Delivered Directly To Homes From Mizoram And Myanmar, The Northeastern States Are Becoming A Haven For Drug Addiction.

मनोजकुमार लस्कर8 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत. मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये तापमान खाली घसरले. रस्ते निर्मनुष्य आहेत. पण शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हाती टॉर्च व लाकडी काठ्या घेऊन दिसले. विचारपूस केल्यावर समजले की हे पोलिस नसून ‘यंग मिझो असोसिएशन’चे (वायएमए) स्वयंसेवक आहेत. राज्याच्या नसानसांत भिनणाऱ्या म्यानमारच्या ‘आइस’ या सिंथेटिक ड्रग्जपासून नव्या पिढीस वाचवण्यासाठी ते पहारा देत आहेत.

मिझोराम सध्या इतिहासातील सर्वात भयंकर नशा संकटाचा सामना करत आहे. म्यानमारच्या ५०० किमी लांब खुल्या सीमेवरून येणाऱ्या धोकादायक सिंथेटिक ड्रग्जने राज्याची सामाजिक घडी विस्कटून टाकली. गेल्या वर्षी या ड्रग्जने ११८ तर या वर्षी आतापर्यंत २१ बळी घेतले. म्यानमार सीमेला लागून चंफाई जिल्हा याचा मुख्य मार्ग आहे. ‘भास्कर’ ने २०० किमी फिरून हे नेटवर्क जवळून समजून घेतले. हा संपूर्ण व्यवसाय डिजिटल पद्धतीने होत आहे. ड्रग्ज पुरवठादार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिक्रेट ग्रुप्स बनवून नेटवर्क चालवतात. फक्त चॅट ग्रुपचा स्क्रीन शॉट दाखवून सहजासहजी ड्रग्ज मिळतात. ‘भास्कर’ने वायएमएच्या सदस्याकडे काही स्क्रीन शॉट्स मागितले तेव्हा त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ते देण्यास नकार दिला. मिझोराम उत्पादन शुल्क आणि अमली पदार्थविरोधी विभागाचे सहआयुक्त पीटर जोहमिंगथांगा म्हणाले, स्थानिक नेटवर्कमध्ये ‘आइस’ आणि ‘कँडी’ सारख्या कोड वर्ड‌्सचा वापर करून ड्रग्ज विकले जात आहेत.

चंफाई : भारतात मृत्यूच्या प्रवेशाचे मुख्य द्वार

मी आता सीमेवरील चंफाई जिल्ह्यात आहे. वायएमएच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस प्रा. मालसॉमलियाना हेही सोबत आहेत. मालसॉमलियाना यांनी आम्हाला सीमेवरील काही भागही दाखवले. तेथून म्यानमारमधून ड्रग्ज मिझोराममध्ये येतात.ते म्हणाले, येथे सीमेपलीकडे म्यानमारचा रिहखावदार भाग आहे. येथे दोन्ही बाजूंच्या लोकांचे कौटुंबिक संबंध आहेत. याच रहदारी आडून अंधारात छोटे कॅरिअर (पेडलर्स) घनदाट जंगलांतून आणि डोंगराळ पायवाटांवरून ड्रग्जचा साठा भारतात आणतात. तेथून ड्रग्ज देशातील इतर भागांसह बांगलादेश आणि अरब देशांपर्यंत पोहोचत आहेत.

समाजाने जबाबदारी घेतली… सुमारे ५ लाख स्वयंसेवक तयार करून ‘ऑपरेशन जेरिको’

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सिंथेटिक ड्रग्जविरुद्ध मिझोरामचे लोक स्वतः लढा देत आहेत. प्रा. मालसॉमलियाना म्हणाले, सरकारी यंत्रणा हतबल दिसू लागली, तेव्हा मिझो समाजाची शतकानुशतके जुनी असलेली ‘त्लावाँगहिन्हा’ (नि:स्वार्थ सेवेची भावना) ही परंपरा जागी झाली. चर्च, स्थानिक समुदाय आणि ५ लाख स्वयंसेवकाच्या वायएमए या संघटनेने स्वतः आघाडी सांभाळली. आम्ही सप्टेंबर २०२५ मध्ये पोलिस व नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने ‘ऑपरेशन जेरिको’ सुरू केले. चंफाईच्या १३ संवेदनशील गावांत स्वयंसेवक तैनात आहेत. गुप्तचर नेटवर्क माहिती देते, त्यानुसार पोलिसांसोबत मिळून धाड टाकतो. आमचे काम पीडितांना वाचवणे.व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत पोहोचवणे हे आहे.

म्यानमारच्या तस्कराकडून मणिपूर मार्गाचा वापर

वायएमएचे केंद्रीय अध्यक्ष आर. लालंघेता म्हणाले, ऑपरेशन जेरिकोचा प्रभाव दिसू लागल्याने तस्करांनी ड्रग्ज आणण्यासाठीचे पारंपरिक रस्ते बंद केले. आता ड्रग्ज तस्कर मणिपूर मार्गाचा वापर करत आहेत. आधी म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश केला जातो. तिथून ड्रग्ज मिझोराम व इतर राज्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *