Headlines

नदीत वाहून जाणाऱ्या शाम्पू पुड्या पकडताना तिघींचा बुडून मृत्यू:दोन बहिणींसह काकूचा करुण अंत, मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात घटना




सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी व पोहण्यासाठी गेल्यानंतर तरुणीच्या हातातील शाम्पूच्या १० पुड्या निसटून पाण्यात वाहू लागल्या. त्या घेण्यासाठी तिने तेलाचा प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेऊन खोल पाण्यात प्रवेश केला. पाण्यात डब्याचे झाकण उघडले. डब्यात पाणी शिरले. त्याच वेळी तरुणी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तिची बहीण पाण्यात गेली. बहिणींच्या मागे काकूही गेल्या. मात्र, तिघी बुडत असल्याचे दिसताच गावातील ३ महिला व एक पुरुष असे एकूण ४ जण पाण्यात उतरले. तिघींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिघींचा शोध लागला नाही. गावातील तरुण १९ वर्षीय भरतरे शिंदे याने बुडत असलेल्या इतर चौघांना वाचवले. मात्र तिघींचा बुडून मृत्यू झाला. काही वेळाने ग्रामस्थांच्या मदतीने तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उत्कर्षा उत्तम जाधव (२१), समीक्षा उत्तम जाधव (१८) व सिंधू दत्ता जाधव (४५) अशी मृतांची नावे आहेत. तिघींच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याची खोली जास्त असल्याने तिघींना वाचवता आले नाही मी गावातील गोदावरी नदीपात्रात सकाळी पोहताना गावातील काही महिला धुणे धुण्यासाठी आल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी बुडाल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतर चौघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र ते चौघेही पाण्यात बुडू लागले. मी त्वरित त्या ठिकाणी जाऊन चौघांना वाचवले. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने तिघींना वाचवता आले नाही. – भरतरे शिंदे, मोहळा, ता. सोनपेठ. उत्कर्षाला १५ दिवसांपूर्वीच पुण्यात कंपनीत लागली होती नोकरी उत्कर्षा उत्तम जाधव हिचे अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे शिक्षण पूर्ण झाले होते. ती १५ दिवसांपूर्वी पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी रुजू झाली होती. शनिवार-रविवार सुटी असल्याने ती आईवडिलांना भेटण्यासाठी गावात आली होती. परंतु ही भेट कुटुंबासाठी शेवटची ठरेल हे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *