![]()
आजपासुन शाळांना सुरुवात होत असूनग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायलासुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वीआपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्यानावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गनाकेल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकीतब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशःमोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोरआले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा,गळके छत, गायब स्वच्छतागृहे. या दयनीय अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. तरीही शाळांची दुरवस्था कायम आहे. शहरालगत असलेल्या पळशी येथील जि.प. शाळेत १९७० मधील ८ वर्गखोल्या आहेत.त्यांचे पत्रे आणि अँगल पूर्णपणे तुटले आहेत.ऐन पावसाळ्यात ३१० विद्यार्थ्यांच्या अंगावरछत कोसळण्याची भीती प्रभारी मुख्याध्यापक पंकज मंडगे यांनी व्यक्त केली.चौक्याजवळील शाळेत स्वच्छतागृहांचीअवस्था नरकासमान आहे. रायगवानच्याशाळेला साधी सुरक्षा भिंतही नाही. लामकाना तांड्यावरील संतापलेले नागरिक म्हणतात, अधिकारी फक्त येतात. पाहून जातात. अनेक शाळांमध्ये दोन ते तीन वर्गांतील विद्यार्थी एकाच वर्गात बसवतात. ३.४६ कोटींचा प्रस्ताव कागदावरच अतिवृष्टीमुळे कन्नड (२५), गंगापूर (३६), सिल्लोड (३९),वैजापूर (१२) आणि फुलंब्री (६) अशा एकूण ११८ शाळांचेनुकसान झाले. या शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागानेतब्बल ३ कोटी ४६ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप या शाळांची अवस्था ”जैसे थे”चआहे. दुरुस्तीची कामे सुरू आहेत शाळा दुरुस्तीची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी अद्यापही कामे बाकी आहे. शिक्षण विभागाकडून अहवाल मागितला असून स्वतः यावर लक्ष ठेवून आहे. मुख्यध्यापकांना देखील काही अडचणी असल्यास त्यांनी थेट येऊन सांगितले तरी चालेल. – पी. एम. मिन्नू, मुख्य कार्यकारीअधिकारी शाळांचे ”स्ट्रक्चरलऑडिट” तातडीने करा नवीन सीईओ विद्यार्थ्यांसाठी कामकरत आहेत, पण आता संपूर्ण जिल्हाभरातील शाळांचे तातडीने”स्ट्रक्चरल ऑडिट” करण्याची वेळ आली आहे. जि.प. शाळेतील मुले हुशार आहेत, त्यांना केवळ भौतिकसुविधांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नयेत. तत्काळ उपाय करावेत. – विजय साळकर,जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती. वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला : शिक्षणाधिकारी मोडकळीस आलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनाविचारले असता, त्यांनी केवळ ”शाळांची तपासणी करूनवरिष्ठ स्तरावर सीईओंना अहवाल दिला आहे”, असे उत्तर दिले. ”डीपीडीसी” आणि ”सीएसआर”मधून निधी आणूनदुरुस्ती करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.
Source link
खिडक्या तुटल्या, फरशा उखडल्या, पत्रेगंजले…; तरीही आज "स्कूल चले हम’:जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळांच्या दुरुस्तीची मागणी