![]()
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये जमिनीच्या १०० फूट खाली नदी वाहणार आहे. वर शेती सुरू राहील. हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. शिप्रा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कान्ह नदी जमिनीखालून नेली जाणार आहे. हैदराबादमधील ८० तज्ज्ञांच्या पथकाने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. हे काम मे २०२७ मध्ये पूर्ण होईल. हा बोगदा ‘डी’ आकाराच्या बॉक्ससारखा आहे. यासाठी ४ उभे शाफ्ट तयार करण्यात आले आहेत. शिप्रा नदीत इंदूरच्या कान्ह नदीचे दूषित पाणी मिसळते. हे रोखण्यासाठी कान्ह डायव्हर्जन क्लोज्ड डक्ट प्रकल्प तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोशन कुमार सिंह सांगतात की, या माध्यमातून शिप्रा नदी पूर्णपणे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त केली जाईल. दृष्टिक्षेपात प्रकल्प कान्ह नदीचे पाणी गंभीर नदीत सोडले जाणार कान्ह नदीचे पाणी जमालपुरा गावातून वळवले जाईल. हे पाणी उज्जैन शहर आणि शिप्रा नदीच्या घाटांपासून दूर, गंभीर नदीत खालच्या दिशेने सोडले जाईल. सिंहस्थ २०२८ मध्ये येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना स्नानसाठी स्वच्छ पाणी मिळेला.- शुभम अग्रवाल, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
Source link
जमिनीच्या 100 फूट खाली वाहणार नदी:वर होणार शेती; देशातील पहिलाच प्रकल्प 2027 मध्ये होणार पूर्ण