Headlines

मुंबईकडे निघालेला "लाँग मार्च' शहरात:भीमसैनिकांकडून ‎जल्लोषात स्वागत‎




अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय (मुंबई) दरम्यान निघालेला ‘लाँग मार्च’ अहिल्यानगर शहरात दाखल झाला. यावेळी शहरातील समस्त भीमसैनिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिंगारे यांचा सत्कार केला व आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मार्चमध्ये सहभागी झालेल्या हजारो भीमसैनिकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी समाज बांधवांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. या ऐतिहासिक स्वागत सोहळ्याप्रसंगी नगरसेवक सुरेश बनसोडे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, निवृत्ती आरू, अमित काळे, प्रा. जयंत गायकवाड, एन. एम. पवळे, विशाल गायकवाड, भीमराव पगारे, सिद्धार्थ राजगुरू, सिद्धार्थ आढाव, संजय खामकर, महेश भोसले आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *